संस्कृतच्या प्रचारासाठी सर्वस्व अर्पणाची भावना ठेवा - प्रा. संभाजी पाटील
रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) | माध्यमिक स्तरावर अध्यापन करणाऱ्या संस्कृत शिक्षकांनी योग्य, सुटसुटीत आणि सोप्या संस्कृतचा उपयोग करावा आणि नियमित सरावाने संस्कृत भाषेला आत्मसात करावे. विद्यार्थ्यांच्या मनावर शिक्षकांनी संस्कृतचा संस्कार करावा आण
संस्कृत कार्यशाळा


रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) | माध्यमिक स्तरावर अध्यापन करणाऱ्या संस्कृत शिक्षकांनी योग्य, सुटसुटीत आणि सोप्या संस्कृतचा उपयोग करावा आणि नियमित सरावाने संस्कृत भाषेला आत्मसात करावे. विद्यार्थ्यांच्या मनावर शिक्षकांनी संस्कृतचा संस्कार करावा आणि संस्कृतच्या प्रचारासाठी सर्वस्व अर्पणाची भावना ठेवा, असे प्रतिपादन पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठ भारतीय ज्ञान परंपरा आणि संस्कृत विश्वकोष केंद्रातील प्रा. संभाजी पाटील यांनी केले.

संस्कृत कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र आणि भारतीय भाषा समिती शिक्षा मंत्रालय (नवी दिल्ली), गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, संस्कृत शिक्षक मंडळाच्या सहयोगाने संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, फक्त संस्कृत वाचून आणि बोलून चालणार नाही. त्यासोबतच ते तितकेच योग्य व शुद्ध स्वरूपाचे हवे. संस्कृत भाषा आजही समर्पक आहे. ज्याप्रमाणे गीतेत भगवंतांनी नवविधा भक्ती सांगितली आहे, अगदी त्याप्रमाणे प्रत्येक संस्कृतप्रेमी आणि संस्कृत शिक्षकाने स्वत:कडून जेवढे योगदान या भाषेसाठी करता येईल तेवढे द्यावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande