सोलापूर महापालिकेचे प्रभाग घराण्यांची रणभूमी
सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक केवळ पक्षांची न राहता थेट राजकीय कुटुंबांची झाल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये उमेदवार पाहिले असता राजकारणाचा वारसा हा थेट घरातूनच मिळाल्याने उमेदवार थेट निवडणूक र
सोलापूर महापालिकेचे प्रभाग घराण्यांची रणभूमी


सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक केवळ पक्षांची न राहता थेट राजकीय कुटुंबांची झाल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये उमेदवार पाहिले असता राजकारणाचा वारसा हा थेट घरातूनच मिळाल्याने उमेदवार थेट निवडणूक रिंगणात उतरल्याचे दिसत आहे. यात आमदार सुपुत्र, सासूबाई, भाऊ, सुनबाई, बंधुराज, तसेच माजी नगरसेवक व माजी महापौरांची पुढची पिढी असा संपूर्ण कुटुंबीयांचा फौजफाटा निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे.काही प्रभागांमध्ये थेट आमदारांचे सुपुत्र उमेदवार आहेत, तर काही ठिकाणी आमदारांच्या सासूबाई किंवा भावांनी राजकीय प्रवेश केला आहे. काही प्रभागांत आमदारांच्या सुनबाई निवडणूक लढवत असून, तर काही ठिकाणी बंधुराज राजकीय मैदानात उतरले आहेत. एवढेच नव्हे तर माजी नगरसेवक, माजी महापौर यांच्या घरातील तरुण पिढीही निवडणुकीत सक्रिय आहे. महापालिकेची निवडणूक लोकशाहीपेक्षा वंशपरंपरेची निवडणूक असल्याचे बोलले जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande