जळगाव जिल्ह्याचा सुपूत्र सचिन कुमावत ‘बिग बॉस मराठी’च्या घरात
जळगाव, 12 जानेवारी (हिं.स.) ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाला ११ जानेवारीपासून सुरुवात झाली असून यामध्ये तब्बल 17 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री केली आहे. ज्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा सुपूत्र आणि केसावर फुगेसह दमदार अहिरणी गाणी करणारा स
सचिन कुमावत


जळगाव, 12 जानेवारी (हिं.स.) ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाला ११ जानेवारीपासून सुरुवात झाली असून यामध्ये तब्बल 17 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री केली आहे. ज्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा सुपूत्र आणि केसावर फुगेसह दमदार अहिरणी गाणी करणारा सचिन कुमावतचा देखील समावेश आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे आणि अहिराणी भाषेतील म्युझिक व्हिडीओमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या सचिन कुमावक यांची बिग बॉसच्या घरातील एन्ट्री विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. यंदा अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय रिॲलिटी शो होस्ट करत असून, पुढील १०० दिवस बरेच लोकप्रिय अभिनेते-अभिनेत्री, कॉमेडियन, इन्फ्लूएन्सर, राजकीय व्यक्तिमत्त्वे आणि नृत्यांगना बिग बॉसच्या घरात कैद राहणार आहेत. बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाच्या पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रांतील ओळखीच्या चेहऱ्यांनी घरात प्रवेश करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.त्यामध्ये दीपाली सय्यद, सागर कारंडे, सचिन कुमावत, सोनाली राऊत, आयुष संजीव, तन्वी कोलते, करण सोनावणे, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, अनुश्री माने, रुचिता जामदार, राकेश बापट, रोशन भजनकर आणि दिव्या शिंदे हे कलाकार आतापर्यंत बिग बॉसच्या घरात सहभागी झाले आहेत. एकूण १७ सदस्यांच्या या घरात विविध स्वभाव, विचारसरणी आणि पार्श्वभूमी असलेले स्पर्धक पुढील काळात सर्वांना पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातील १७ सदस्यांपैकी तिसरा सदस्य म्हणून खान्देशचा सुप्रसिद्ध युट्युब स्टार सचिन कुमावत याने घरात एन्ट्री करताच विशेष लक्ष वेधून घेतले. घरात प्रवेश करताना सचिनने अहिराणी भाषेत संवाद साधत सर्वांनाच थक्क केले. “माझ्या अहिराणी मायबोलीला जगभरात पोहोचवणार आहे. 14 कोटी व्ह्यूजना 14 हजार कोटी व्ह्यूवर घेऊन जायचं स्वप्न आहे”, अशी महत्त्वाकांक्षा घेऊन सचिन कुमावत यांनी घरात एन्ट्री केली आहे. दरम्यान, जळगावच्या जामनेर तालुक्यातील मूळ शेंदुर्णी येथील रहिवाशी असलेल्या सचिनचे युट्युबवर २० लाखांपेक्षा अधिक सबस्क्राईबर तर इन्टाग्रामसह फेसबुवर लाखोंनी फॉलोवर्स आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande