नांदेडच्या एकलव्य स्पोर्ट्स क्लबच्या संकल्पनेला राज्यात पाचवे स्थान
नांदेड, 12 जानेवारी (हिं.स.)। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षकांच्या राज्यस्तरीय शाळा क्लब सादरीकरण स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील संस्थेच्या छ. शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक संभाजी गायकवाड
राज्यस्तरीय शाळा क्लब सादरीकरण स्पर्धेत संभाजी गायकवाड यांचे यश


नांदेड, 12 जानेवारी (हिं.स.)। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षकांच्या राज्यस्तरीय शाळा क्लब सादरीकरण स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील संस्थेच्या छ. शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक संभाजी गायकवाड यांनी सादर केलेल्या “एकलव्य स्पोर्ट्स क्लब” या संकल्पनेला राज्यभरातून पाचवा क्रमांक मिळणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे. हे यश त्यांच्या सादरीकरणापुरते मर्यादित नसून, एकलव्य क्रीडा अकॅडमीच्या दीर्घकालीन, शिस्तबद्ध आणि मूल्याधारित कार्याची पावती आहे.

एकलव्य क्रीडा अकॅडमी – ग्रामीण क्रीडा संस्कृतीचे प्रेरणास्थान

एकलव्य क्रीडा अकॅडमी ही केवळ प्रशिक्षण केंद्र नसून, शिस्त, चिकाटी, संघभावना आणि नेतृत्वगुण घडवणारी एक जीवनशाळा आहे. येथे विद्यार्थ्यांना योगा व मल्लखांब, कबड्डी, खो-खो, कराटे, बॉक्सिंग, फुटबॉल, व्हॉलीबॉल तसेच मैदानी खेळांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत अनेक विद्यार्थी खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने भव्य इनडोअर स्टेडियम उभारणीसाठी निधी मंजूर होऊन २०२६ पासून सरावासाठी उपलब्ध होणार आहे—ही एकलव्य अकॅडमीच्या विश्वासार्हतेची साक्ष आहे.

या राज्यस्तरीय यशामागे संभाजी गायकवाड सरांची संकल्पना मांडण्याचे कौशल्य, संघकार्यावरचा विश्वास आणि संस्थेचे पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या सादरीकरणातून एकलव्य क्रीडा अकॅडमीचा उद्देश, कार्यपद्धती आणि परिणामकारकता प्रभावीपणे मांडली गेली, ज्यामुळे राज्यपातळीवर उपक्रमाची दखल घेण्यात आली.

----------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande