स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त गोदावरी अभियांत्रिकी विविध उपक्रम संपन्न
जळगाव, 12 जानेवारी (हिं.स.) स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवक दिना च्या निमित्ताने गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव यांच्या वतीने सोमवार, दिनांक १२ जानेवारी रोजी विविध प्रेरणादायी उपक्रमांचे आय
स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त गोदावरी अभियांत्रिकी विविध उपक्रम संपन्न


जळगाव, 12 जानेवारी (हिं.स.) स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवक दिना च्या निमित्ताने गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव यांच्या वतीने सोमवार, दिनांक १२ जानेवारी रोजी विविध प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सकाळी भव्य विद्यार्थी–शिक्षक रॅली तर दुपारच्या सत्रात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान स्वदेशीचा आत्मा, आत्मनिर्भर भारत, युवकांची भूमिका, राष्ट्रउभारणी व स्वामी विवेकानंदांचे विचार या विषयांवर प्रेरणादायी घोषणा देण्यात आल्या. “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका”, “युवकशक्ती राष्ट्रशक्ती” अशा घोषणांनी परिसर भारावून गेला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande