सोलापूर : निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली
सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. शहरातील 26 प्रभागांमधील राजकीय चुरस वाढली असतानाच, यंदाच्या प्रचारात एक विशेष चित्र पाहायला मिळत आहे. किशोरवयीन मुलांची मोठी फौज उमेदवारांच्या प्रचारा
सोलापूर : निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली


सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. शहरातील 26 प्रभागांमधील राजकीय चुरस वाढली असतानाच, यंदाच्या प्रचारात एक विशेष चित्र पाहायला मिळत आहे. किशोरवयीन मुलांची मोठी फौज उमेदवारांच्या प्रचारात उत्साहाने उतरली असल्याचे पहायला मिळाले.सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत पदयात्रा, कोपरा सभा आणि रॅलीमध्ये ही मुले अग्रभागी दिसत आहेत. हातात पक्षाचे झेंडे, गळ्यात उपरणे आणि ओठांवर लाडक्या उमेदवाराच्या घोषणा देत ही मुले गल्लीबोळ दणाणून सोडत आहेत. ही पिढी तंत्रज्ञानात तरबेज असल्याने, केवळ घोषणाबाजीच नव्हे तर उमेदवारांचे रिल्स बनवणे आणि व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे प्रचार करण्याची धुराही त्यांनी समर्थपणे पेलली आहे. पॉकेटमनी अन्‌‍ मेजवानीचे आकर्षण केवळ हौस म्हणूनच नव्हे, तर अनेक ठिकाणी पॉकेटमनी आणि प्रचाराच्या निमित्ताने मिळणाऱ्या खाऊ-पिऊच्या मेजवानीमुळे ही मुले आकर्षित होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande