सोलापूर जिल्ह्यात 66 लाख साखर पोत्यांची निर्मिती; उताऱ्यातही घेतली आघाडी
सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप करुन 66 लाख साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. सहकारी साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. अजिंक्यतारा, कृष्णा, श्रीराम, रयत या कारखान्यांना सर्वा
sugar mill


सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप करुन 66 लाख साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. सहकारी साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. अजिंक्यतारा, कृष्णा, श्रीराम, रयत या कारखान्यांना सर्वाधिक साखर उतारा मिळाला आहे. जरंडेश्वर कारखान्याने सर्वाधिक 12 लाख सात हजार 980 मेट्रिक टन ऊस गाळप करत आघाडी घेतली आहे.जिल्ह्यातील आठ खासगी व नऊ सहकारी असे एकूण 17 साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप वेगाने सुरु आहे. आतापर्यंत या सर्व साखर कारखान्यांनी मिळून 71 लाख 60 हजार 989 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 66 लाख 1 हजार 170 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. सरासरी 9.22 टक्के साखर उतारा असला, तरी सहकारी कारखान्यांची उताऱ्यात आघाडी दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande