जिल्हाधिकारी, सीईओ यांनी केली अंबाजोगाईत वसतिगृहाची पाहणी
बीड, 12 जानेवारी (हिं.स.)।अंबाजोगाई येथील मुर्लीच्या वसतिगृहाची शासकीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी पाहणी केली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या या वसतिगृहात त्यांनी स
जिल्हाधिकारी, सीईओ यांनी केली अंबाजोगाईत वसतिगृहाची पाहणी


बीड, 12 जानेवारी (हिं.स.)।अंबाजोगाई येथील मुर्लीच्या वसतिगृहाची शासकीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी पाहणी केली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या या वसतिगृहात त्यांनी संपूर्ण

कामकाजाची तपासणी केली.

जिल्हाधिकारी आणि मुख्य वसतिगृहातील सुविधा, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी यांची माहिती कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थिनींसोबत संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आणखी कोणत्या सुविधा हव्या आहेत, याबाबत विचारणा केली. विद्यार्थिनींसाठी लायब्ररीची गरज लक्षात घेऊन कुठे आणि कशी लायब्ररी तयार करता येईल, यावर गृहपाल भवरे यांच्यासोबत नियोजनात्मक चर्चा झाली.भवरे यांनी विद्यार्थिनींनी मिळवलेली कौशल्ये आणि बक्षिसांची माहिती दिली. या पाहणीवेळी अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे, उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे उपस्थित होते. पथकाने वसतिगृहाच्या कामकाजाचा आढावा घेतला. समाधान व्यक्त केले. गृहपाल, विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या प्रसंगी कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande