नांदेडमध्ये महायुतीचे आमदार प्रचारार्थ मैदानात उतरले
नांदेड, 12 जानेवारी (हिं.स.)।नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली आहे त्या निमित्ताने दोन्ही पक्षाचे नेते निवडणुकीच्या प्रचारार्थ रिंगणात उतरले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार
राष्ट्रवादी शिवसेना युतीचे आमदार प्रचारार्थ मैदानात उतरले


नांदेड, 12 जानेवारी (हिं.स.)।नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली आहे त्या निमित्ताने दोन्ही पक्षाचे नेते निवडणुकीच्या प्रचारार्थ रिंगणात उतरले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील तसेच आमदार आनंद बोंढारकर यांनी संयुक्तरीत्या प्रचार सुरू केला आहे

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 20 (सिडको, हडको, वाघाळा, आसदवन) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारानिमित्त सिडको व हडको परिसरातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी खासदार तथा लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील व शिवसेनेचे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी कॉर्नर बैठका पार पडल्या.

प्रभाग क्रमांक 20 मधून

अ - अनुसूचित जाती महिला उमेदवार सौ.संघमित्रा डि.के.कांबळे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

ब- ओबीसी महिला उमेदवार योगिता अमोल येरगेवार

क- ओबीसी उमेदवार संतोष महादेवराव कांचनगिरे, ड- सर्वसाधारण महिला रेखाताई विनायकराव आकुरके,

ई- सर्वसाधारण उमेदवार विनय विश्वंभरराव पाटील गिरडे हे उमेदवार शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढत आहेत.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande