छत्रपती संभाजीनगरचा पहिला महापौर हा शिवसेनेचाच असलाच पाहिजे- एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)। शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित विराट प्रचारसभेत बोलताना स्पष्ट भूमिका मांडली की, नामांतरानंतरच्या या पहिल्याच महापालिका निवडणुकीत छत्रपती
छत्रपती संभाजीनगरचा पहिला महापौर हा शिवसेनेचाच असलाच पाहिजे- एकनाथ शिंदे


छत्रपती संभाजीनगर, 12 जानेवारी (हिं.स.)। शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित विराट प्रचारसभेत बोलताना स्पष्ट भूमिका मांडली की, नामांतरानंतरच्या या पहिल्याच महापालिका निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरचा पहिला महापौर हा शिवसेनेचाच असलाच पाहिजे. खोट्या हिंदुत्वाचा मुखवटा घालून शहरावर डोळा ठेवणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा खरा हिंदुत्ववादी बाणा दाखवण्याची हीच वेळ आहे. असे सांगताना उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले,इतिहास साक्षी आहे – छत्रपती संभाजी महाराजांचा घात बाहेरच्यांनी नव्हे, तर घरभेद्यांनी केला होता. आजही असेच घरभेदी समाजात सक्रिय आहेत, त्यांना ओळखून वेळीच दूर ठेवणे गरजेचे आहे. छत्रपती संभाजीनगर ही शिवसेनेची संघर्षभूमी आहे. मुंबई–ठाण्यानंतर शिवसेनेला सर्वाधिक बळ याच शहराने दिले. बाळासाहेब ठाकरे यांचे या शहरावर आणि या शहराचे शिवसेनेवर जीवापाड प्रेम होते. म्हणूनच यंदा महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, हा निर्धार आहे. विकासाच्या बाबतीतही स्पष्ट ग्वाही देण्यात आली – पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्मार्ट सिटी, शेंद्रा–बिडकीन औद्योगिक क्षेत्र, रोजगारनिर्मिती आणि २०० एमएल़डी पाणीपुरवठा योजना पूर्ण करून शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाईल. सिडकोची जमीन फ्री-होल्ड करणे, गुंठेवारीत ५० टक्के सवलत कायम ठेवणे आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात येणार असून याचा थेट फायदा मध्यमवर्गीय व घरकुलधारकांना होणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरचा सर्वांगीण विकास निश्चित असून, ज्यांनी या पवित्र नामांतराला विरोध केला, त्यांना याच निवडणुकीत जनताच योग्य उत्तर देईल. यावेळी शिवसेनेचे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नेते पदाधिकारी आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande