
नांदेड, 12 जानेवारी (हिं.स.)।नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ भाजपा चे प्रभाग क्र. २ तरोडा-खु चे उमेदवार सौ.अश्विनी कैलास सावते, सखाराम सदाशिव तुप्पेकर, सौ.कविता संतोष मुळे, सतीश पुंडलिकराव देशमुख तरोडेकर यांच्या प्रचारासाठी माजी आमदार सौ. अमिता चव्हाण व आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी बैठक घेतली. भाजपा प्रवक्ते व जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या निवासस्थानी कॉर्नर बैठक घेतली.भाजपाच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन प्रभागातील मतदारांना केले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय लहानकर, सदस्य निलेश बारडकर आदींसह प्रभागातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis