शेतकरी कुटुंबातील तरुणांचा व्यवसायाकडे कल वाढत चालला - आमदार प्रकाश सोळंके
बीड, 12 जानेवारी (हिं.स.)। शेतकरी कुटुंबातील तरुणांचा व्यवसायाकडे कल वाढत चालला आहे ही अभिमानाची आणि नवीन ध्येयाची कल्पना असल्याचे मत माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंक यांनी केले आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघ
शेतकरी कुटुंबातील तरुणांचा व्यवसायाकडे कल वाढत चालला


बीड, 12 जानेवारी (हिं.स.)।

शेतकरी कुटुंबातील तरुणांचा व्यवसायाकडे कल वाढत चालला आहे ही अभिमानाची आणि नवीन ध्येयाची कल्पना असल्याचे मत माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंक यांनी केले आहे.

माजलगाव विधानसभा मतदारसंघातील संतोष कंकाळ आणि अजित कंकाळ हे शेतकरी कुटुंबातील तरुण. आपल्या पारंपरिक शेती व्यवसायासोबतच पूरक व्यवसाय उभारण्याच्या निर्धाराने हॉटेल व्यवसायात उतरले आहेत. याचा निश्चितच आनंद होत असल्याचे आमदार सोळंके म्हणाले.

शेतकरी पुत्रांनी सुरू केलेल्या शेतकरी पुत्र हॉटेलचे आज आमदार सोळंके यांनी उदघाटन केले.ग्राहकांना आपलेसे वाटावे, या उद्देशाने त्यांनी हॉटेलला एक अर्थपूर्ण व आपुलकीचे नाव दिले आहे.

परिश्रम, चिकाटी आणि नव्या विचारसरणीच्या बळावर त्यांनी व्यवसायात केलेल्या या पदार्पणाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande