
सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.)।अंबिया बहरामधील डाळिंबासाठी विमा योजना राबवण्यात येणार आहे. डाळिंब फळबाग विमा योजनेत दोन वर्ष वय पूर्ण असलेल्या डाळिंब बागेस विमा कंपनी मार्फत प्रति हेक्टर 1 लाख 60 हजार रुपये विमा संरक्षण प्रदान करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे. 14 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात आल्याची माहिती सांगोला कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे.डाळिंबाचे कोठार म्हणून ओळखले जाणाऱ्या सांगोला तालुक्यातील शेतकरी पुन्हा डाळिंब लागवडीकडे जोमाने वळला आहे. दररोज नव्याने डाळिंबाची लागवड होत आहे. येत्या काळात गारपीट व हवामान धोक्यापासून डाळिंबाच्या बागेचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, म्हणून शासन स्तरावरून विमा योजना राबवली जात आहे. यामध्ये प्रती हेक्टरी 1 लाख 60 हजार रुपये संरक्षित रक्कम देण्यात येणार असल्याचे विमा कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड