भाजपा उमेदवार गणेश बिडकर यांचा प्रचारानिमित्त २० लाख पावले चालण्याचा टप्पा पार
पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)। प्रभागातील नागरिकांची थेट भेट घेण्याच्या उद्देशाने गेल्या सहा महिन्यांहून अधिक घरोघरी संपर्क प्रस्थापित करताना भारतीय जनता पार्टीचे नेते आणि प्रभाग २४ मधील उमेदवार गणेश बिडकर यांनी जवळपास २० लाख पावले चालण्याचा टप्पा पा
भाजपा उमेदवार गणेश बिडकर


पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)।

प्रभागातील नागरिकांची थेट भेट घेण्याच्या उद्देशाने गेल्या सहा महिन्यांहून अधिक घरोघरी संपर्क प्रस्थापित करताना भारतीय जनता पार्टीचे नेते आणि प्रभाग २४ मधील उमेदवार गणेश बिडकर यांनी जवळपास २० लाख पावले चालण्याचा टप्पा पार केला आहे. प्रभागातील ६० हजार नागरिकांशी किमान तीनदा थेट संपर्क साधण्याचे उद्दिष्ट गणेश बिडकर यांनी या कालावधीत पूर्ण केले आहे.

प्रभाग २४ मधील नागरिकांशी त्यांनी मॉर्निंग वॉकदरम्यान संवाद साधला. बिडकर यांच्या स्मार्टफोनवरील फिटनेस ॲपनुसार त्यांनी गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत दररोज किमान १०,५११ पावलांचे अंतर चालले आहे.

याविषयी माध्यमांशी बोलताना बिडकर म्हणाले, 'माझा प्रभाग पुण्याच्या मध्यवर्ती भागात असल्याने प्रचारादरम्यान पदयात्रा काढल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे निवडणूक काळात पदयात्रा नको, असे आम्ही आधीच ठरविले होते. त्यामुळे नियमित संपर्कासाठी घरोघरी भेट देण्याच्या कामास आम्ही जुलै २०२५मध्येच सुरवात केली होती.'

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande