
सोलापूर, 12 जानेवारी (हिं.स.) । सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज आणि त्यांचे सद्गुरू श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यांच्यातील अनन्यसाधारण भक्तीचा आणि व्याकुळतेचा इतिहास आता भाविकांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे श्री सिद्धरामेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने मंदिर परिसरातील तलावात गुरुभेटीचा प्रसंग साकारणान्या दोन भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली. तांत्रिक तन्ज्ञ राजू यादव यांच्या सहकायनि हे शिल्प श्री गणेश मंदिराजवळील तलावात बसवण्यात आले आहे. भाविकांना सिद्धगमेश्वर महाराजांची अवळ गुरुभवती आणि गुरु-शिष्य जात्याचा मडिया समजावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या नवीन शिल्पामुळे सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून, भाविकांना आपल्या आराध्य दैवताच्या जीवनप्रवासातील सर्वात महत्वाचा क्षण आता जवळून न्याहाळता येणार आहे.परंतु, श्रीशीलममध्येही गुरुची भेट न झाल्याने अत्यांत व्यथित झालेल्या बाल सिद्धरामेश्वरांनी कड्यावरून उडी मारून प्राणार्पण करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी खुद श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन प्रकट झाले आणि त्यांनी मिद्धरामेश्वरांना उडी मारण्यापासून रोखत दर्शन विले. हाच अलौकिक प्रसंग या शिल्पाच्या माध्यमातून जिवंत करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड