
नांदेड, 13 जानेवारी, (हिं.स.)। पक्षाच्या प्रतिमेला व संघटनात्मक शिस्तीला बाधा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने भाजपाचे महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजुरकर यांनी एकूण २२ जणांची पक्षामधून हकालपट्टी केली आहे.
भाजपा महानगराध्यक्ष माजी आ. राजुरकर यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले की, महापालिकेच्या निवडणुकीतील भाजपा पदाधिकारी वकार्यकर्ते असताना पक्षशिस्त, धोरणे व निर्णय यांचे पालन होणे अपेक्षित होते. परंतु आपल्या कार्यपध्दतीमुळे पक्षाच्या प्रतिमेला व संघनात्मक शिस्तीला बाधा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या संदर्भात पक्षाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून त्यानुसार शिरीष खोडे, विनायक सगर, माणिक उर्फ विरेंद्र देशमुख, सुशिलकुमार चव्हाण, सुधाकर पांढरे, सुनिल भालेराव, क्षितीज जाधव, दुष्यंत सोनाळे, शेख फारुख, व्यंकट मुदीराज, भानुसिंह रावत, हुकुमसिंह गहलोत, कांचन गहलोत, मुन्नासिंह तेहरा, दिलीपसिंघ सोडी, अनिल गाजुला, भीमराव गायकवाड, विश्वनाथ जटाळे, अंबादास गोरे, संतोष कांचनगिरे, प्रभू कपाटे, नवनाथ कांबळे आदी २२ जणांची पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदावरुन तसेच सध्या भुषवित असलेली पदे समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णय पक्षहित व संघटनात्मक शिस्त लक्षात घेऊन घेण्यात आलेला असून तो तात्काळ लागू राहिल, असे भाजपाचे महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजुरकर यांनी पत्रात म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis