
रत्नागिरी, 13 जानेवारी, (हिं. स.) मुंबईतील दादर-माटुंगा कल्चरल सेंटरने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन सुगम गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत पार पडली. यावेळी रत्नागिरीच्या स्वरा अमित भागवतला रत्नागिरी केंद्रातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी डिसेंबरमध्ये महिन्यात पार पडली होती. यातून स्वरा भागवत, आदित्य लिमये, सार्था गवाणकर आणि हर्ष भोंडाळे यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. अलीकडेच अंतिम फेरीही पार पडली. यामध्ये या चौघांनी गीतगायन केले. अंतिम फेरीसाठी सुप्रसिद्ध गायिका माधुरी करमरकर, डॉ. आनंद नांदे, संगीतकार मिलिंद जोशी यांनी परीक्षण केले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात स्वरा भागवतला रत्नागिरी केंद्राची विजेती घोषित करण्यात आले आणि रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्वरा भागवत रत्नागिरीतील सौ. विनया परब यांच्याकडे शास्त्रीय गायन शिकत असून संवादिनीवादनाचेही शिक्षण घेत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी