
रत्नागिरी, 13 जानेवारी, (हिं. स.) : सुवर्णमहोत्सवी माघी गणेशोत्सवानिमित्त येथील खालच्या आळीतील मारुती कॉमन क्लबने येत्या १७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता ढोल वादन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पारंपरिक वादनकलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली असून मुरलीधर मंदिराच्या पटांगणात स्पर्धा होणार आहे.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या तीन पथकांना रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट ढोलवादक, उत्कृष्ट ताशावादक व उत्कृष्ट वेशभूषा यांसाठी स्वतंत्र चषक ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ जानेवारी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे.नावनोंदणी व अधिक माहितीसाठी सतीश बाम (९४०३९३६८२९), दर्शन खानोलकर (९१५८१२८११४) आणि शैलेंद्र भाटवडेकर (८५५१८८२३३३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मारुती कॉमन क्लबने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी