परभणी -गंगाखेड येथे नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई
परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)नायलॉन मांजा हा जीवघेणा गुन्हा असून तो मानवासह मुक्या पक्षांच्या जीवितासाठी प्राणघातक ठरू शकतो. नायलॉन मांजाचा वापर, साठवणूक आणि विक्री कायद्याने गंभीर गुन्हा आहे. यासाठी परभणी पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात विशेष मोहीम र
-नायलॉन मांजा विरूद्ध पोलिसांची विशेष मोहीम


परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)नायलॉन मांजा हा जीवघेणा गुन्हा असून तो मानवासह मुक्या पक्षांच्या जीवितासाठी प्राणघातक ठरू शकतो. नायलॉन मांजाचा वापर, साठवणूक आणि विक्री कायद्याने गंभीर गुन्हा आहे. यासाठी परभणी पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी(दि. १३) गंगाखेड येथील जयैदीपुरा मोहल्ला परिसरात एका किराणा दुकानात प्रतिबंधित नायलॉन मांजा मिळून आला. दुकानदाराविरोधात गंगाखेड पोलिसांत भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायलॉन मांजा विरूद्ध विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हा शाखेचे पथक संपूर्ण जिल्ह्यात छापेमारी करत असून गंगाखेड येथे पोलिस अंमलदार परसराम गायकवाड, माणिक वाघ आणि शरद सावंत यांचे पथक जैदीपुरा मोहल्ला येथील रियाज नसरोउद्दीन शेख याच्या किराणा दुकानात शोध घेतला शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा मिळून आला. नायलॉन मांजा विरोधात पोलिस प्रशासनाने शुन्य सहनशीलतेचे धोरण अवलंबिले असून पतंग उडवून सण आनंदाने आणि उत्साहात साजरा करावा मात्र नायलॉन मांजाचा वापर अजिबात करू नये. तसेच आपल्या आणि इतरांच्या जीवाची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. परभणी पोलिस दलाकडून जिल्हाभरात नायलॉन मांजा विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये दुकानदार, विक्रेते आणि वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. नायलॉन मांजाची विक्री साठवणूक किंवा वापर करताना आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे परभणी पोलिसांच्या वतीने कळविण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande