विकासासाठी सातत्याने काम करण्याचा ठाम संकल्प-आ. कल्याणकर
नांदेड, 13 जानेवारी (हिं.स.)।नांदेड–वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रतीक्षा बाबुराव गजभारे, सुशीलकुमार भीमसिंग चव्हाण, अरुणा भीमराव कोकाटे आणि संदीपसिंग शंकरसिंग गाडी
आमदार


नांदेड, 13 जानेवारी (हिं.स.)।नांदेड–वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रतीक्षा बाबुराव गजभारे, सुशीलकुमार भीमसिंग चव्हाण, अरुणा भीमराव कोकाटे आणि संदीपसिंग शंकरसिंग गाडीवाले यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेला शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी संबोधित केले.

या वेळी उपस्थित नागरिकांनी दाखवलेला उत्साह आणि विश्वास आगामी विजयाची स्पष्ट दिशा दर्शवणारा ठरला. असल्याचे आमदार कल्याणकर यांनी सांगितले.

शिवसेनेच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा ठाम संकल्प यावेळी मांडण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत सक्षम प्रशासन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. येत्या गुरुवारी, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande