
छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिली. शहरातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीमध्ये त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी बोलताना भागवत कराड म्हणाले की संभाजीनगर महापालिकेत भारतीय जनता पक्षाला निश्चितपणाने विजय मिळणार आहे
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 नागेश्वरवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. सीमा सिद्धार्थ साळवे, श्री. अनिल श्रीकिशन मकरीये, सौ. कीर्ती महेंद्र शिंदे, श्री. समीर सुभाष राजुरकर यांच्या प्रचारार्थ भव्य व उत्स्फूर्त प्रचार फेरी मोठ्या जनसहभागात संपन्न झाली.
या प्रचार फेरीदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना, शहर विकासाची स्पष्ट दिशा तसेच प्रभाग क्रमांक 17 च्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीची ठाम भूमिका प्रभावीपणे मांडण्यात आली.रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व देतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. कमळ या निशाणीला भरघोस पाठिंबा देत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी केला.या प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक 17 मध्ये उत्साहाचे आणि परिवर्तनाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis