संक्रांतीआधी तिळाचे दर २० ते २५ रुपयांनी कडाडले
छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी, (हिं.स.)। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाच्या बाजारात मोठी दरवाढ पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसाचा तिळाच्या पिकाला फटका बसल्याने यंदा उत्पादनात तब्बल ९० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे बाजारात उच्च दर्जाच्या
संक्रांतीआधी तिळाचे दर २० ते २५ रुपयांनी कडाडले


छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी, (हिं.स.)। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाच्या बाजारात मोठी दरवाढ पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसाचा तिळाच्या पिकाला फटका बसल्याने यंदा उत्पादनात तब्बल ९० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे बाजारात उच्च दर्जाच्या तिळाचा तुटवडा निर्माण झाला असून, दरात प्रतिकिलो २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे.

येत्या काही महिन्यांतही तिळाचे दर तेजीतच राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे खरीप हंगामात देशात पांढऱ्या तिळाचे उत्पादन अडीच लाख टनांच्या आसपास असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सतत होणारा अवकाळी पाऊस, एकरी उत्पादनातील घट आणि अपेक्षित भाव नमिळाल्यामुळे २०२५ च्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी तिळाच्या पेरणीकडे पाठ फिरवली. याचा थेट परिणाम बाजारातील आवकेवर झाला असून, यंदाचे उत्पादन केवळ २५ ते ३० हजार टनांपर्यंतच मर्यादित राहिले आहे. त्यातही उच्च दर्जाचा माल केवळ १० टक्के इतकाच उपलब्ध असल्याने दिवाळीपासूनच तिळाच्या दरात वाढ सुरू झाली आहे. संक्रांत जवळ येत असताना चांगल्या प्रतिच्या तिळाची कमतरता अधिक तीव्र झाली आहे.

उन्हाळी पीक मे-जूनमध्येच बाजारात येणार असल्याने, तोपर्यंत दरवाढीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या काळात दर्जानुसार तिळाचे दर प्रतिकिलो १८० रुपयांदरम्यान होते. मात्र, सध्या घाऊक बाजारात हेच दर १५० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

उन्हाळी पीक मे-जून महिन्यांत येणार, तोपर्यंत दर कायम राहण्याची शक्यता आहे .पांढऱ्या, काळ्या, लाल तिळाला मागणी आहे .पांढरा, काळा आणि लाल असे तिळाचे प्रकार गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, आंध प्रदेश, महाराष्ट्रात उत्पादित होतात. संक्रांतीसाठी प्रामुख्याने पांढऱ्या तिळाला मागणी असते, तर आयुर्वेदिक उपयोग व विविध पदार्थांसाठी काळा तीळ, आणि धार्मिक पूजेसाठी लाल तीळ वापरला जातो.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande