छ. संभाजीनगर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च
छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी (हिं.स.) : महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी रूट मार्च काढून नागरिकांना सूचना दिल्या आहेत. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यां
Do not take the law into your own hands,' say the police.


छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी (हिं.स.) : महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी रूट मार्च काढून नागरिकांना सूचना दिल्या आहेत. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध ठिकाणी रूट मार्च आयोजित करण्यात आला.

रूट मार्चमध्ये पोलिस आयुक्त, दोन पोलिस उपायुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त, सहा पोलिस निरीक्षक, 11 सहायक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, 460 पोलिस अंमलदार आणि 190 राज्य राखीव दलाचे जवान सहभागी झाले. चंपाचौक, शहागंज, टाउन हॉल, मकई गेट, बीबी का मकबरा या मार्गांवर हा रूट मार्च काढण्यात आला.

पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट सूचना दिल्या की, कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये आणि मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शांतता राखावी.

शहरातील 1267 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणूक होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया 16 जानेवारी रोजी स्ट्रॉंग रूम परिसरातील गरवारे हायटेक फिल्म, एमआयडीसी चिकलठाणा, सेंट फ्रान्सीस हायस्कूल, जालना, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पदमपुरा व शाखा रेल्वे स्टेशन उस्मानपुरा येथे घेण्यात येणार आहे. या परिसरात मतमोजणी संपेपर्यंत फक्त आयोगाने निश्चित केलेल्या व्यक्ती व उमेदवारांना प्रवेश दिला जाईल, असे पोलिस आयुक्तालयाने सांगितले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande