
छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी (हिं.स.)। गंगापूर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान, पीकविमा आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कायगाव येथील गोदावरी नदीच्या पाण्यात जलसमाधी आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र प्रशासनाने तात्काळ दखल घेत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि पीक विम्याची रक्कम यांचे पैसे अनेकांना आलेले नाहीत. त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले.पीक विम्याचे काम शासन स्तरावर सुरू आहे. तालुक्यातील सर्व गावांची यादी शासनाच्या अनुदान पोर्टलवर अपलोड केली आहे, अनुदान वाटप प्रक्रिया चालू आहे, राहिलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान पाठपुरावा करून लाभार्थ्याच्या खात्यावर टाकण्यात येईल, एक हजार ५१ विहिरींचे पंचनामे गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis