भाजपला संधी द्या तुमची घरे सातबारावर आणण्याची जबाबदारी माझी - अशोक चव्हाण
नांदेड, 13 जानेवारी (हिं.स.)भाजपला संधी द्या तुमची घरे सातबारावर आणण्याची जबाबदारी माझी आहे, असे माजी खासदार अशोक चव्हाण यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत विविध प्रभागात झालेल्या प्रचारादरम्यान सांगितले. निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी भाजपला संधी द्
भाजपला संधी द्या तुमची घरे सातबारावर आणण्याची जबाबदारी माझी - अशोक चव्हाण


नांदेड, 13 जानेवारी (हिं.स.)भाजपला संधी द्या तुमची घरे सातबारावर आणण्याची जबाबदारी माझी आहे, असे माजी खासदार अशोक चव्हाण यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत विविध प्रभागात झालेल्या प्रचारादरम्यान सांगितले.

निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी भाजपला संधी द्या मी पिरयु-हानच्या नागरिकांना ग्वाही देतो की, रहिवाशांना त्यांच्या घरांना मालकी हक्क मिळवून देत त्यांचे सातबाऱ्यावर नाव लावून देतो अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोक चव्हाण यांनी दिली. प्रचार सभेत बोलत होते.

प्रचार सभेस माजी मंत्री डि.पी. सावंत, माजी आमदार तथा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, प्रविण साले यांच्यासह प्रभाग पाच मधील भाजपचे उमेदवार जयश्री निलेश पावडे, अॅड. महेश कनकदंडे, शांभवी प्रविण साले, साहेबराव गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, भाजपा पक्षा बद्दल विरोधक अपप्रचार करत आहेत. प्रश्न भाजप मार्गी लावू शकत नाही असं वक्तव्य करत आहेत. हे चुकीचे असून, ऍड. निलेश पावडे यांनी नागरिकांसाठी न्यायालयीन लढाई लढली आहे. याची आठवण करुन देत. चव्हाण यांनी इनामी जमिनीच्या बाबतीतील कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असून, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे पिरबुन्हानच्या जनतेने चुकीचा गैरसमज करुन घेऊ नये.

योजनेत कुठे जातीभेद केला का असा सवाल करत, कुठल्याही योजनांत भाजप सर्व जातीधर्मातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नांदेड महापालिकेत विरोधक कितीही टीका केले तरी त्यांच्याकडे लक्ष न देता. भाजपला संधी द्या तुमची घरे सातबारावर आणण्याची जबाबदारी माझी आहे, असेही चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी माजी मंत्री डी.पी. सावंत, महानगराध्यक्ष तथा माजी आ.अमर राजूरकर यांच्यासह उमेदवारांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत भाजपला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रभाग पाचमधील मतदार, महिलांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande