
नांदेड, 13 जानेवारी, (हिं.स.)। हिमायतनगर तालुक्यातील कारला या गावी संत राजा भगिरथ जयंतीनिमित्त आणि मकर संक्रांतीचे औचित्य साधून १४ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळात वाशीम जिल्ह्यातील रामखेड येथील हभप अजय महाजन (दादा) यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे.
या कीर्तन सोहळ्यास तबला वादक म्हणून महाराष्ट्र भुषण पांडुरंग आबा भिसे, सुरज पाटील माने बोरी, गायक सिबदरा येथील ज्ञानेश्वर महाराज, आनंदराव महाराज, मारोतराव महाराज, खैरगाव येथील भगवानराव गुंपलवाड महाराज, वडगाव ज येथील हभप नारायण महाराज ताडकुले यांची ऊपस्थीती सोहळ्यास राहणार आहे. किर्तनानंतर महाप्रसाद देण्यात येणार आहे. या किर्तन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन सगरवंश मित्र मंडळासह कार्ला येथील ग्रामस्थांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis