
छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी (हिं.स.)। 'पालकांनी मुलांकडे घरी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मुले व्यसनांच्या आहारी जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. त्यांच्या मित्रांची माहिती ठेवून वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केल्यास मुलांना योग्य दिशा मिळते,' असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड यांनी केले.
सातारा परिसरातील विश्वेश्वरय्या इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे १४ वे वार्षिक स्नेहसंमेलन तापडिया नाट्यमंदिरात पार पडले. 'कलियुग' समाजजागृतीपर संकल्पनेवर आधारीत कार्यक्रम सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पोवाडा, शेतकरी आत्महत्या, ऑपरेशन सिंदूर, स्त्रियांवरील अत्याचार, असत्याकडून सत्याकडे जाण्याचा प्रवास, मुलींचे स्वसंरक्षण आणि एकलव्याच्या जीवनावर आधारीत नाट्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विभागाचे उपायुक्त अंकुश पांढरे यांनी केले. यावेळी डॉ. अशोक तेजनकर, संस्थेच्या अध्यक्षा सुनीता तेजनकर, पुष्कर तेजनकर, मुख्याध्यापिका अॅड. शैलजा वडगावकर, प्राचार्या तापसी सेन यांची प्रमुख उपस्थिती होती.
विश्वेश्वरय्या स्कूलच्या स्नेहसंमलेनात विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले.गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. 'छोटा बच्चा', 'सितारे जमीन पे', 'ओम शांती ओम', ही गाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष नाटीका सादर केली. खेळाडू विश्वा चव्हाण, शिवराज मोघल यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis