
नांदेड, 13 जानेवारी, (हिं.स.) - नांदेडच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी, येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा मंत्री अदिती तटकरे यांनी नांदेड येथे केले.
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त प्रभाग क्रमांक ६ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रवेशिका क्षितिज जाधव व ॲड. नाज शेख अब्दुल जब्बार यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य प्रचार फेरी आणि जाहीर सभेला उपस्थित राहून नांदेडकरांशी संवाद साधला.
यावेळी उपस्थित जनसमुदायाचा उत्साह पाहून नांदेडच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जनतेचा असलेला विश्वास अधोरेखित झाला आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनीसभेत संवाद साधताना प्रामुख्याने महिलांच्या आरोग्य आणि सक्षमीकरणावर भर दिला. नांदेडच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी, येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना 'घड्याळ' चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यानिमित्ताने केले. यावेळी, आमदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर, श्रीमती मीनल खतगांवकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis