
बीड, 13 जानेवारी, (हिं.स.)।रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील पारगाव टोलनाका येथे महाराष्ट्र पोलीस केंद्र मांजरसुंबा यांच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या अभियानात पोलीस उपनिरीक्षक दहातोंडे यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी वाहन चालक व मालकांना थांबवून वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व, वाहन विमा, अपघातांची प्रमुख कारणे, सुरक्षित वाहनचालन तसेच पादचाऱ्यांनी रस्त्यावर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहन चालकांचे गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे वाहन चालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश पोहोचून जनजागृतीस चालना मिळाली. यावेळी कर्मचारी उपस्थित होते. वाहनचालकांमध्ये वाहतुक नियमविषयक जनजागृती करण्यात आली.
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत पारगाव टोल नाक्याजवळील अहिल्यादेवी होळकर करिअर अकॅडमी येथे वि सकॅडमी येथे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत सहायक पोलीस निरीक्षक बालाजी ढगारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वाहतूक सुरक्षा, हेल्मेट वसीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व, वाहन विमा,
अपघातांची कारणे, वाहन चालविताना घ्यावयाची दक्षता तसेच पादचाऱ्यांनी रस्त्यावर चालताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis