एसबीआय करारामुळे रायगड जि. प.च्या कर्मचाऱ्यांना कोटींचे संरक्षण
रायगड, 13 जानेवारी, (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि रायगड जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या
एसबीआय करारामुळे राजिप कर्मचाऱ्यांना कोटींचे संरक्षण


रायगड, 13 जानेवारी, (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि रायगड जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत हा करार औपचारिकरीत्या संपन्न झाला. या करारामुळे जिल्हा परिषदेतील हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांना बँकिंग सुविधांचा मोठा लाभ मिळणार आहे.

एसबीआयच्या राज्य शासन वेतन खाते योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी झिरो बॅलन्स पगार खाते उघडण्यात येणार आहे. किमान शिल्लक न ठेवता खाते चालविण्याची सुविधा मिळणार असून, त्यासोबतच मोफत वैयक्तिक अपघात विमा देण्यात येणार आहे. या विमा योजनेत १ कोटी १० लाखांपासून २ कोटी ६० लाखांपर्यंत संरक्षण उपलब्ध होणार आहे. तसेच मोफत हवाई अपघात विमा, कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास ८० लाखांपर्यंत तर पूर्ण अपंगत्व आल्यास १ कोटी रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांसाठी ५५ लाख रुपयांपर्यंतचा सवलतीच्या दरातील आरोग्य विमा ही या योजनेची आणखी एक ठळक बाब आहे. या विम्यात खातेधारकासह जोडीदार व दोन अपत्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय एसबीआयच्या सर्व एटीएममधून मोफत रोख रक्कम काढण्याची सुविधा, इतर बँकांच्या एटीएमवर दरमहा १० मोफत व्यवहार, लॉकर भाड्यात ५० टक्केपर्यंत सूट, तसेच कार, गृह व वैयक्तिक कर्जांवर अतिरिक्त सवलती दिल्या जाणार आहेत.

पगाराच्या रकमेप्रमाणे सिल्व्हर, गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम आणि रोडियम अशी विविध प्रकारची वेतन खाती उपलब्ध करून देण्यात येणार असून याचा थेट लाभ अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार आहे. या करारामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षितता वाढून त्यांचे मनोबल उंचावेल, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे स्वागत करत कर्मचाऱ्यांसाठी हा करार मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande