
छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथील आंबेडकर डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन बुधवारी (१४ जानेवारी) साजरा केला जाणार आहे. या दिनानिमित्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १४ जानेवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत मिलिंद चौक ते मकाई गेट हा मार्ग सार्वजनिक वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. नागरिकांनी वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
अभिवादनासाठी आलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मिलिंद चौकापासून ते मकाई गेट या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. या परिसरातील नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन छावणी वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक सचिन मिरधे यांनी दिली.
नगर नाका, भावसिंगपुऱ्याकडून मिलिंद चौक मार्गे बेगमपुरा, विद्यापीठ, पाणचक्की, बीबी का मकबऱ्याकेडे जाणारी सर्व वाहने मिलिंद चौक, बारापुल्ला गेट, मिल कॉर्नरमार्गे जातील.बेगमपुरा, बीबी का मकबऱ्याकडून विद्यापीठ गेट, मिलिंद चौकमार्गे नगर नाका व छावणीत येणारी वाहने मकाई गेट, टाउन हॉल, भडकल गेट, मिल कॉर्नर, बाबा पेट्रोल पंपमार्गे जातील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis