नांदेडात 'आयटी पार्क' सुरू करण्याचा भाजपाचा संकल्प – डॉ. अजित गोपछडे
नांदेड, 13 जानेवारी, (हिं.स.)। नांदेड शहर वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्राचे मुख्य केंद्र झाले पाहिजे. भविष्यात नांदेडला आयटी पार्क उभारून या शहराची ओळख ''आयटी हब'' म्हणून निर्माण करण्याचा भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे. त्यासाठी नांदेडकरांनी भाजपा
नांदेडात 'आयटी पार्क' सुरू करण्याचा भाजपाचा संकल्प – डॉ. अजित गोपछडे -


नांदेड, 13 जानेवारी, (हिं.स.)। नांदेड शहर वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्राचे मुख्य केंद्र झाले पाहिजे. भविष्यात नांदेडला आयटी पार्क उभारून या शहराची ओळख 'आयटी हब' म्हणून निर्माण करण्याचा भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे. त्यासाठी नांदेडकरांनी भाजपाला साथ द्यावी, असे आवाहन भाजपाचे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केले.

प्रभाग क्र. ४ व ९ मधील भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, डी.पी. सावंत, राम पाटील रातोळीकर, बालाजी बच्चेवार, बालाजी पाटील अंबुलगेकर, संजय पाटील रातोळीकर आदींची उपस्थिती होती. देशात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे या शहराच्या विकासासाठी नांदेडातही भाजपाचा महापौर झाला पाहिजे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहरात कोट्यवधी रुपयांची असंख्य विकासकामे झाली आहेत. भविष्यातही या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नांदेडकरांनी देवेंद्र फडणवीस आणि अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येतील. बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी उद्योगधंदे आणण्यात येतील. नांदेडात आयटी पार्क आणून या शहराची ओळख आयटी हब म्हणून केली जाईल. विरोधकांकडे विकासाचा कोणताही मुद्दा नसल्याने ते भाजपा नेत्यांना शिव्याशाप देण्यापलीकडे काहीच करीत नाहीत. नांदेडकरांनी कोणत्याही भूलथापांना, दबावाला बळी न पडता भाजपाला साथ द्यावी, असे आवाहन खा. डॉ. गोपछडे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande