
छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी (हिं.स.)। फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजयनगर येथे प्रभाग क्र.२५ मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठक उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीत (अ) मनोज बन्सीलाल (मामा) गांगवे, (ब) सविता भगवान (बापू) घडामोडे, (क) प्रियंका दीपक खोतकर आणि (ड) रवी साहेबराव कावडे यांच्या समर्थनार्थ नागरिकांशी थेट संवाद साधला.प्रभागातील विकासकामे, नागरी समस्या आणि आगामी काळातील विकासाचा आराखडा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीस माजी महापौर बापू घडामोडे, राजू शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थित होती
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis