दोन्ही ढोलक्या वाजवणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवावा - खा.डॉ.बोंडे
अमरावती, 13 जानेवारी (हिं.स.)। दोन्ही ढोलक्या वाजवणाऱ्यांना मतदारांनो योग्य जागा दाखवा, सावध व्हा. ते रोड शोदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसतात, हात वर करतात व नंतर उतरून जातात, अशा शब्दांत भाजपाचे राज्यसभा खा. डॉ. अनिल बोंडे यांनी प्रभाग क्र.
दोन्ही ढोलक्या वाजवणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवावा - खा.डॉ.बोंडे  नवनीत राणा यांचे नाव न घेता केला शाब्दिक प्रहार


अमरावती, 13 जानेवारी (हिं.स.)।

दोन्ही ढोलक्या वाजवणाऱ्यांना मतदारांनो योग्य जागा दाखवा, सावध व्हा. ते रोड शोदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसतात, हात वर करतात व नंतर उतरून जातात, अशा शब्दांत भाजपाचे राज्यसभा खा. डॉ. अनिल बोंडे यांनी प्रभाग क्र. १९ साईनगरच्या साईरत्न लॉनमध्ये दु. २ वाजता आयोजित भाजपा उमेदवारांच्या प्रचार सभेत भाजपाच्या स्टार प्रचारक माजी खा. नवनीत राणा यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिकास्त्र सोडले.

साईनगर प्रभागात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा झाली. पालकमंत्र्यांच्या सभेतच आधी डॉ. बोंडे यांनी नाव न घेता नवनीत राणा यांच्या दुटप्पी भुमिकेचा खरपूस समाचार घेतला. एकिकडे त्या भाजपाच्या स्टार प्रचारक म्हणून मिरवतात तर दुसरीकडे घरचा पक्ष असलेल्या युवा स्वाभिमानच्या उमेदवारांसाठी मतं मागतात. या त्यांच्या भुमिकेवरून शहरात राजकीय गदारोळ सुरू आहे. विशेषतः भाजपातील उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच नाराज आहेत. याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार सभेत थेट कोणताही वक्तव्य करण्याचे टाळले. त्यामुळे प्रचार सभेला उपस्थित मतदार आश्चर्य व्यक्त करीत राहिले. पालकमंत्र्यांनी भाजपाचा महापौर बनल्यानंतर मतदारांचा कसा फायदा होणार यावरच सर्वाधिक प्रकाश टाकला. बहुतेक सर्वच सभांमध्ये ते याबाबत बोलत असल्यामुळे त्यांचे सर्व चेंडू हे मतदारांच्या दृष्टीने वाईड ठरले. ही निवडणूक साईनगरप्रभागातील उमेदवार तुषार भारतीय, चेतन गावंडे, लता देशमुख व सरिता मालानी यांच्यासाठी महत्त्वाची आहे. युवा स्वाभिमानने मित्र पक्ष असतानाही येथे त्यांनी ब वार्ड वगळता अ, क व ड वार्डातउमेदवार दिले आहेत. त्यातही ड वार्डात भाजपाचे माजी सभागृह नेते तुषार भारतीय यांच्या विरोधात युवा स्वाभिमानने उमेदवारी दिली आहे. हा प्रभाग सध्या शहरात 'हॉटस्पॉट' आहे.

उमेदवारांच्या नशिबाची नव्हे तर खुद्द मतदारांच्याच नशीबाची निवडणूक ठरणार आहे. पालकमंत्र्यांच्या अखत्यारितील विविध योजनांचा सहज लाभ मिळणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. अमरावतीला पश्चिम विदर्भातील सर्वात सुंदर शहर बनवायचे असून येथे रिंग रोड, आणखी ८ उड्डाणपुलं उभारली जाणार आहेत. माझ्या ७८५ कोटी निधीतून मी जास्तीत जास्त साईनगरला देईन, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande