
छत्रपती संभाजीनगर, 13 जानेवारी (हिं.स.)। फुलंब्री नगरपंचायती मध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री.योगेश मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे स्वीकृत नगरसेवकपदी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री.मनोज मुळे यांची निवड झाली आहे.
फुलंब्री नगरपंचायतीच्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेते पदाची आणि स्वीकरत नगरसेवक पदाची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी सांगितले कीनवीन जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून फुलंब्रीच्या विकासासाठी हे नेतृत्व अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास आहे.याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक श्री.देविदास भाऊ ढंगारे, श्री.शेखर दादा पालकर, श्री.गजानन नागरे, आवेज चिस्ती यांची उपस्थिती होती..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis