अंबाजोगाईतील अल्पसंख्याक बहुल भागांसाठी ५० लाखांचा विकास निधी मंजूर
बीड, १४ जानेवारी (हिं.स.) : अंबाजोगाई शहरातील अल्पसंख्याक बहुल भागांमधील नागरी सुविधा सुधारण्यासाठी ५० लाख रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला असून, केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या विशेष पाठपुराव्याला यश आले आहे. सन २०२५–२६
अंबाजोगाईतील अल्पसंख्याक बहुल भागांसाठी ५० लाखांचा विकास निधी मंजूर


बीड, १४ जानेवारी (हिं.स.) : अंबाजोगाई शहरातील अल्पसंख्याक बहुल भागांमधील नागरी सुविधा सुधारण्यासाठी ५० लाख रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला असून, केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या विशेष पाठपुराव्याला यश आले आहे.

सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजनेअंतर्गत ही मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी आमदार नमिता मुंदडा यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. अंबाजोगाई शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या वतीने विविध विकासकामांच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन आ. मुंदडा यांनी संबंधित प्रस्ताव शासनाकडे सादर केला आणि त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून घेतला.

या शासन निर्णयानुसार अंबाजोगाई शहरासाठी एकूण ५० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून पाच प्रमुख विकासकामे करण्यात येणार आहेत. मौलाली दर्गा परिसरात १० लाख रुपये खर्चून संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. आशिकुल्ला दर्गा परिसरात १० लाख रुपये खर्चून बेड (पेव्हर ब्लॉक) तयार करण्यात येणार आहेत. कुरेशी कब्रस्तान येथे १० लाख रुपये खर्चून बेड तयार केले जातील. मंगळवार पेठेतील महमदिया मस्जिद परिसरात १० लाख रुपये खर्चून बाथरूम बांधकाम होणार आहे. तसेच फ्लॉवर्स क्वार्टर येथील कासिम अली मस्जिद परिसरात आवश्यक विकासकामे करण्यात येणार आहेत.या निधीमुळे अंबाजोगाई शहरातील अल्पसंख्याक बहुल भागांमध्ये मूलभूत नागरी सुविधा मजबूत होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande