ढगाळ वातावरणामुळे जळगावात थंडी गायब
जळगाव, 14 जानेवारी (हिं.स.) जळगावसह राज्यात ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. यामुळे गारठा कमी होऊन उकाडा जाणवू लागला आहे जळगावचे कमाल तापमान १०.९ अंश इतके होते. मात्र दिवसाच्या तापमानात वाढ होऊन ते २९.६ अंशावर
ढगाळ वातावरणामुळे जळगावात थंडी गायब


जळगाव, 14 जानेवारी (हिं.स.) जळगावसह राज्यात ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. यामुळे गारठा कमी होऊन उकाडा जाणवू लागला आहे जळगावचे कमाल तापमान १०.९ अंश इतके होते. मात्र दिवसाच्या तापमानात वाढ होऊन ते २९.६ अंशावर पोहोचले आहे.दरम्यान हवामान खात्यानं वर्तविलेल्या अंदाजानुसार आज राज्याच्या किमान तापमानातील वाढ, तर उद्यापासून किमान तापमानात पुन्हा हळूहळू घट होण्याचा अंदाज आहे. दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हवामान विभागानुसार काल धुळे येथे ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे ७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तसेच जळगाव, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ येथे ११ अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात उद्यापासून किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.जळगावात मागच्या काही दिवसापासून रात्रीचे किमान तापमान ११ अंशाखाली आहे. किमान तापमान कमी असले तरी थंडीचा कडाका कमी झाला आहे. काल मंगळवारी अचानक तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे रात्री जाणवणारी थंडी कमी जाणवली. दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande