इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची वार्षिक पडताळणी अनिवार्य-वैध मापन शास्त्र विभागाचा खुलासा
पुणे, 14 जानेवारी (हिं.स.)। केंद्र शासनाच्या उपभोक्ता मामले मंत्रालयाने 18 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वजने, मापे पडताळणीचा कालावधी एक वर्षांवरून दोन वर्षांचा करण्यात आला आहे, अशा आशयाचे वृत्त वृत्तपत्रात प्रसारित करण्यात आल्य
इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची वार्षिक पडताळणी अनिवार्य-वैध मापन शास्त्र विभागाचा खुलासा


पुणे, 14 जानेवारी (हिं.स.)। केंद्र शासनाच्या उपभोक्ता मामले मंत्रालयाने 18 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वजने, मापे पडताळणीचा कालावधी एक वर्षांवरून दोन वर्षांचा करण्यात आला आहे, अशा आशयाचे वृत्त वृत्तपत्रात प्रसारित करण्यात आल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.या अनुषंगाने वैध मापन शास्त्र सर्वसाधारण नियम, 2011 मधील नियम 27 अन्वये नवीन सुधारणा करुन सर्व वजने, मापे, पडताळणी, सर्व लांबीची मोजमापे, टेप, बीम स्केल, काउंटर मशीन तसेच पेट्रोल-डिझेल (डिस्पेन्सर) यांच्या पडताळणी कालावधी हा एक वर्षाऐवजी दोन वर्षाचा केला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची पडताळणी कालावधीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून इलेक्ट्रॉनिक वजन काटे यांची पडताळणी पूर्वीप्रमाणे दरवर्षी करणे अनिवार्य राहणार असून संबंधित व्यापाऱ्यांनी नियत कालावधीत पडताळणी करून घेणे आवश्यक असल्याबाबत विलास पवार, सहनियंत्रक वैध मापन शास्त्र, पुणे यांनी खुलासा केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande