लातूर : यंदा दहावीचे १ लाखांहून अधिक तर बारावीचे ९६ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
लातूर, 14 जानेवारी (हिं.स.)।लातूर विभागात यंदा होणाऱ्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेला १ लाखांहून अधिक तर बारावीच्या परीक्षेला सुमारे ९६ हजार विद्यार्थी बसणार आहेत. शिक्षण मंडळाच्य
दहावीचे १ लाखांहून अधिक तर बारावीचे ९६ हजार विद्यार्थी देणार परीक्षा


लातूर, 14 जानेवारी (हिं.स.)।लातूर विभागात यंदा होणाऱ्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेला १ लाखांहून अधिक तर बारावीच्या परीक्षेला सुमारे ९६ हजार विद्यार्थी बसणार आहेत. शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षा केंद्रांची निश्चिती, पर्यवेक्षक व परीक्षकांची नियुक्ती, प्रश्नपत्रिका वितरण व्यवस्था तसेच कॉपीमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

परीक्षांचा कालावधी फेब्रुवारी ते मार्च २०२६ असा असणार आहे. दहावीची परीक्षा लातूर विभागातील एकूण ४७८ केंद्रांवर तर बारावीची परीक्षा २५३ केंद्रांवर घेतली जाणार आहे. परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरण मिळावे आणि परीक्षा सुरळीत पारपडावी, यासाठी शिक्षण विभाग, स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुविधा, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी तसेच सुरक्षेची योग्य व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षेला बसणार असून, नांदेड जिल्ह्यात परीक्षार्थीची संख्या सर्वाधिक आहे. परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांमध्ये अंतिम तयारीचा वेग वाढला असून, शिक्षकांकडून उजळणी मार्गदर्शन आणि पालकांकडून मानसिक आधार देण्यावर भर दिला जात आहे. शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना अफवांपासून दूर राहून अधिकृत वेळापत्रक व सूचनांनुसारच परीक्षा द्यावी, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande