पनवेल : विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप – हॅप्पी सिंग
रायगड, 14 जानेवारी (हिं.स.) : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मध्ये महायुतीचे उमेदवार हॅप्पी सिंग यांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून विरोधक अस्वस्थ झाले असून, त्यातूनच माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असा आरोप
विरोधक घाबरले; म्हणूनच बिनबुडाचे आरोप – हॅप्पी सिंग


रायगड, 14 जानेवारी (हिं.स.) : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मध्ये महायुतीचे उमेदवार हॅप्पी सिंग यांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून विरोधक अस्वस्थ झाले असून, त्यातूनच माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असा आरोप हॅप्पी सिंग यांनी केला.

प्रभाग क्रमांक ११ मध्ये हॅप्पी सिंग यांच्यासह नीलम मोहित आणि प्रदीप भगत हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सध्या मात्र महायुतीच्या उमेदवाराला मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कामोठे वसाहतीच्या विकासासाठी हॅप्पी सिंग यांनी आजवर भरीव योगदान दिले असून, सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली कुस्ती स्पर्धा राज्यभर गाजली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांना प्रभाग क्रमांक ११ मधून उमेदवारी दिली आहे.

निवडून आल्यास कामोठे वसाहतीत भव्य कुस्ती संकुल उभारणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक साकार करणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार हॅप्पी सिंग यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक ११ मध्ये महायुतीच्या पॅनेलचे पारडे जड असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. --------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande