
लातूर, 14 जानेवारी (हिं.स.)।महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी बंद राहील. तसेच शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास सुरु राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis