
लातूर, 14 जानेवारी (हिं.स.)उदगीर नगर परिषद निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयी नगरसेवकांनी लातूर येथील भाजपा जिल्हा ग्रामीण कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. तसेच राजमुद्रा अशोक स्तंभ, शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.
उदगीरच्या जनतेने नगर परिषद निवडणुकीत १८ पैकी १४ नगरसेवक आणि नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे निवडून देत पक्षावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. जनतेने टाकलेला विश्वास आणि जबाबदारी भारतीय जनता पक्ष प्रामाणिकपणे, जोमाने आणि विकासाभिमुख कामातून पार पाडतील, असा विश्वास आहे.या भेटीप्रसंगी नगराध्यक्ष स्वाती हुडे यांच्यासह नगरसेवक श्री. मनोज पुदाले, निकिता अंबरखाने, राजकुमार हुडगे, जवाहरलाल कांबळे, विद्या बुंदे, नागेश आष्टुरे, भारती भोसले, भागीरथी महापुरे, . विजय निटुरे, मिना कोठारे, अंजली पस्तापुरे, . शहाजी पाटील, सौ. गोखर्णा गायकवाड यांची उपस्थिती होती.तसेच मंडळाध्यक्ष अमोल अंकल्ले, जिल्हा सरचिटणीस अमोल निडवदे, . गणेश गायकवाड, सुधीर भोसले, सावन पस्तापुरे, विरकुमार अंबरखाने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis