पंतप्रधानांच्या हस्ते उद्या राष्ट्रकुल संसदीय पक्षांच्या सभापतींच्या परिषदेचे उद्घाटन
नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी राष्ट्रकुलच्या सभापती आणि अध्यक्षपदाच्या अधिकाऱ्यांच्या २८ व्या परिषदेचे (CSPOC) उद्घाटन करणार आहेत. ही बैठक संसद भवन संकुलातील संविधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. यावेळी ते उ
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी राष्ट्रकुलच्या सभापती आणि अध्यक्षपदाच्या अधिकाऱ्यांच्या २८ व्या परिषदेचे (CSPOC) उद्घाटन करणार आहेत. ही बैठक संसद भवन संकुलातील संविधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

एका अधिकृत निवेदनानुसार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत ४२ राष्ट्रकुल देशांचे आणि जगातील विविध भागातील चार अर्ध-स्वायत्त संसदेचे ६१ सभापती आणि अध्यक्षपदाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये समकालीन संसदीय मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली जाईल. ज्यामध्ये मजबूत लोकशाही संस्था राखण्यात सभापती आणि अध्यक्षपदाच्या अधिकाऱ्यांची भूमिका समाविष्ट आहे.

या परिषदेत संसदीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर, खासदारांवर सोशल मीडियाचा प्रभाव, संसदेची सार्वजनिक समज वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणे आणि मतदानापलीकडे नागरिकांचा सहभाग यावर देखील चर्चा केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande