59 मेगावॅटच्या हायब्रीड पवन-सौर प्रकल्पांसाठी सीईएटीची क्लीनमॅक्ससोबत भागीदारी
मुंबई, 15 जानेवारी, (हिं.स.)। भारतातील एक अग्रगण्य टायर उत्पादक असलेल्या सीईएटीने, ग्रुप कॅप्टिव्ह मॉडेल अंतर्गत गुजरातच्या हलोल येथील आणि तामिळनाडूच्या कांचीपुरम येथील आपल्या प्रकल्पांसाठी सुमारे 59 मेगावॉटच्या हायब्रीड पवन-सौर प्रकल्पाद्वारे नवीक
59 मेगावॅटच्या हायब्रीड पवन-सौर प्रकल्पांसाठी सीईएटीची क्लीनमॅक्ससोबत भागीदारी


मुंबई, 15 जानेवारी, (हिं.स.)। भारतातील एक अग्रगण्य टायर उत्पादक असलेल्या सीईएटीने, ग्रुप कॅप्टिव्ह मॉडेल अंतर्गत गुजरातच्या हलोल येथील आणि तामिळनाडूच्या कांचीपुरम येथील आपल्या प्रकल्पांसाठी सुमारे 59 मेगावॉटच्या हायब्रीड पवन-सौर प्रकल्पाद्वारे नवीकरणीय ऊर्जा मिळवण्यासाठी क्लीनमॅक्स एन्वायरो एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (“क्लीनमॅक्स”) सोबत भागीदारी केली आहे. ब्रुकफील्ड-समर्थित क्लीनमॅक्स ही कंपनी सध्या भारतातील व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी सर्वात मोठी नवीकरणीय ऊर्जा पुरवणारी कंपनी आहे.

या प्रकल्पांच्या संकरित रचनेमुळे पवन आणि सौर ऊर्जेच्या पूरक निर्मिती वैशिष्ट्यांचे एकत्रीकरण अपेक्षित आहे, ज्यामुळे ऊर्जेचा सातत्यपूर्ण पुरवठा आणि उच्च प्लांट लोड फॅक्टर (पीएलएफ) सुनिश्चित होईल. हा दृष्टिकोन ग्रिडची स्थिरता देखील वाढवतो, जी ऊर्जा-केंद्रित उत्पादन कार्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

एकत्रितपणे, या प्रकल्पांमधून दरवर्षी सुमारे 13.58 कोटी युनिट्स स्वच्छ विजेची निर्मिती अपेक्षित आहे. या निर्मितीमुळे दरवर्षी सुमारे 1,00,000 टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी सुमारे 45 लाख झाडे लावली गेली तर हे शक्य असते. या प्रकल्पामुळे सीईएटीच्या स्वच्छ ऊर्जेचा वाटा सुमारे 60% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

या भागीदारीबाबत सीईएटीचे खरेदी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. रूपेश आर. म्हणाले, “क्लीनमॅक्ससोबतची ही दीर्घकालीन भागीदारी सीईएटीला गुजरात आणि तामिळनाडूमध्ये आमच्या अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातील उपस्थिती मजबूत करण्यास मदत करेल. आम्ही दीर्घकाळासाठी कसे नियोजन करतो यात शाश्वतता हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि सीईएटी आपला व्यवसाय जबाबदारीने वाढवण्यासाठी तसेच भविष्यासाठी लवचिक राहण्यासाठी वचनबद्ध आहे. हरित स्रोतांचा वापर, शाश्वत वाहतूक, बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग, शाश्वत उत्पादन आणि वितरणातील उत्सर्जन कमी करणे यांसारख्या क्षेत्रांमध्ये आधीच प्रगती करत असलेल्या कंपनीसाठी, या संकरित पवन-सौर अक्षय्य ऊर्जेचा अवलंब करणे हे आमच्या दीर्घकालीन प्रवासातील एक नैसर्गिक आणि धोरणात्मक पुढचे पाऊल आहे.”

हे हायब्रिड प्रकल्प आमच्या प्रमुख उत्पादन सुविधांच्या खर्चात कार्यक्षमता आणतील आणि कमी कार्बन फूटप्रिंट असलेले टायर तयार करण्याच्या आमच्या प्रवासात आम्हाला मदत करतील – जे उद्योगासाठी एक आदर्श उदाहरण ठरतील.”

क्लीन मॅक्स एन्वायरो एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक श्री. कुलदीप जैन म्हणाले, “ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ब्रँड असलेल्या सीईएटीसोबत सहयोग ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या प्रमुख उत्पादन केंद्रांमधील कामकाजाचे डीकार्बनायझेशन सक्षम करून आम्ही त्यांच्या धोरणात्मक शाश्वतता उद्दिष्टांना पाठिंबा देत आहोत. सुव्यवस्थित सहयोग कशा प्रकारे नवीकरणीय ऊर्जेचा अवलंब वेगवान करू शकतात आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी अधिक शाश्वत ऊर्जा भविष्य निर्माण करू शकतात, याचे प्रात्यक्षिक हे प्रकल्प दाखवून देतात.”

या समन्वयामुळे, क्लीनमॅक्सच्या सी अँड आय क्षेत्रासाठी अक्षय्य ऊर्जा पुरवण्याच्या सिद्ध कौशल्याचा फायदा घेत, सीईएटीला आपली शाश्वततेची उद्दिष्ट्ये साध्य करणे शक्य होईल. या भागीदारीमुळे सीईएटीची ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल, कार्यान्वयन कार्यक्षमता सुधारेल आणि कार्बन उत्सर्जनात वार्षिक लक्षणीय घट होण्यास हातभार लागेल, ज्यामुळे निव्वळ-शून्य कार्यान्वयनाच्या दिशेने तिचा दीर्घकालीन प्रवास सुकर होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande