शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात तेजी
नवी दिल्ली, 16 जानेवारी (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. बाजाराची सुरुवात वाढीसह झाली होती. सुरुवातीच्या अर्ध्या तासात चढ-उतार दिसून आला, मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्य
Stock Market Rises


नवी दिल्ली, 16 जानेवारी (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. बाजाराची सुरुवात वाढीसह झाली होती. सुरुवातीच्या अर्ध्या तासात चढ-उतार दिसून आला, मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने बाजाराला वेग आला. पहिल्या एका तासाच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स ०.५९ टक्के, तर निफ्टी ०.५४ टक्क्यांनी वाढीसह व्यवहार करत होता.

प्रारंभीच्या व्यवहारात इन्फोसिस, विप्रो, श्रीराम फायनान्स, टेक महिंद्रा आणि महिंद्रा अँड महिंद्रा या दिग्गज शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. हे शेअर्स ४.७७ टक्क्यांपासून १.२१ टक्क्यांपर्यंत वाढीसह व्यवहार करत होते. दुसरीकडे सिप्ला, एटरनल, एचडीएफसी लाईफ, सन फार्मास्युटिकल्स आणि ओएनजीसी या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली असून ते ३.२३ टक्क्यांपासून १.४३ टक्क्यांपर्यंत घसरले होते.

आतापर्यंतच्या व्यवहारात एकूण २,६५४ शेअर्समध्ये व्यवहार सुरू होते. यापैकी १,५८२ शेअर्स वाढीसह हिरव्या निशाणात होते, तर १,०७२ शेअर्स घसरणीसह लाल निशाणात व्यवहार करत होते. सेन्सेक्समधील ३० पैकी २० शेअर्स वाढीसह, तर १० शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. निफ्टीमधील ५० पैकी २८ शेअर्स वाढीसह आणि २२ शेअर्स घसरणीसह दिसून आले.

बीएसई सेन्सेक्सने आज २८८.०८ अंकांच्या वाढीसह ८३,६७०.७९ अंकांवर व्यवहाराची सुरुवात केली. सुरुवातीला चढ-उतार झाल्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने बाजाराने वेग घेतला. सकाळी १०.१५ वाजता सेन्सेक्स ४९१.५९ अंकांच्या वाढीसह ८३,८७४.३० अंकांवर व्यवहार करत होता.

त्याचप्रमाणे एनएसई निफ्टीने ३०.४५ अंकांच्या वाढीसह २५,६९६.०५ अंकांवर व्यवहार सुरू केला. सुरुवातीच्या अर्ध्या तासानंतर खरेदी वाढल्याने निफ्टीतही तेजी दिसून आली. सकाळी १०.१५ वाजता निफ्टी १३८.३० अंकांच्या वाढीसह २५,८०३.९० अंकांवर व्यवहार करत होता.

याआधी बुधवारी सेन्सेक्स २४४.९८ अंकांनी घसरून ८३,३८२.७१ अंकांवर बंद झाला होता, तर निफ्टी ६६.७० अंकांच्या घसरणीसह २५,६६५.६० अंकांवर बंद झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande