कॅम्पस ऍक्टिव्हवेअरचा ऍथलेझर कपड्यांच्या श्रेणीत प्रवेश
नाशिक, 15 जानेवारी (हिं.स.) : स्पोर्ट्स आणि ऍथलेझर फूटवेअर क्षेत्रातील भारतातील आघाडीचा ब्रँड कॅम्पस ऍक्टिव्हवेअरने ऍथलेझर अपेरल अर्थात कपड्यांच्या श्रेणीत अधिकृतपणे प्रवेश केल्याची घोषणा केली आहे. तरुण पिढीला त्यांच्या दैनंदिन जीवनात आरामदायी, स्ट
संग्रहित-ब्रांड लोगो


नाशिक, 15 जानेवारी (हिं.स.) : स्पोर्ट्स आणि ऍथलेझर फूटवेअर क्षेत्रातील भारतातील आघाडीचा ब्रँड कॅम्पस ऍक्टिव्हवेअरने ऍथलेझर अपेरल अर्थात कपड्यांच्या श्रेणीत अधिकृतपणे प्रवेश केल्याची घोषणा केली आहे. तरुण पिढीला त्यांच्या दैनंदिन जीवनात आरामदायी, स्टायलिश आणि बहुउपयोगी पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कंपनीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कॅम्पसच्या दीर्घ प्रवासातील हा एक निर्णायक टप्पा मानला जात आहे.

भारतातील ऊर्जावान, आत्मविश्वासी आणि सतत बदल स्वीकारणाऱ्या तरुणाईशी कॅम्पस ब्रँड नेहमीच जोडलेला राहिला आहे. काम आणि विश्रांती, शिस्त आणि सर्जनशीलता तसेच वैयक्तिक ओळख आणि सामाजिक भान यांचा समतोल राखणाऱ्या या पिढीच्या गरजा लक्षात घेऊनच कॅम्पसने ऍथलेझर कपड्यांचे कलेक्शन सादर केले आहे. यामधून ब्रँडचे “मूव्ह युअर वे” (Move Your Way) हे ब्रीदवाक्य अधिक ठळकपणे समोर येते.

या नव्या श्रेणीत पुरुष व महिलांसाठी पोलो टी-शर्ट्स, राऊंड नेक टी-शर्ट्स, जॅकेट्स, जॉगर पँट्स आणि कॅप्स यांचा समावेश आहे. विविध रंग, डिझाइन्स आणि साईजमध्ये उपलब्ध असलेल्या या कपड्यांच्या किमती ५९९ ते १८९९ रुपयांदरम्यान ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांपर्यंत ही उत्पादने पोहोचू शकतील.

आराम आणि कार्यक्षमतेचा विचार करून डिझाइन केलेल्या या कपड्यांमध्ये अँटी-ओडर, अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आणि टू-वे स्ट्रेच कापडाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसभर ताजेपणा आणि सहज हालचाल शक्य होते. व्यायाम, प्रवास किंवा कॅज्युअल वापरासाठी हे कलेक्शन उपयुक्त आहे.

यावेळी कॅम्पस ऍक्टिव्हवेअरचे पूर्णवेळ संचालक व सीईओ निखिल अगरवाल यांनी सांगितले की, ऍथलेझर कपड्यांच्या बाजारपेठेत पदार्पण करणे हा आमचा एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आहे. यामुळे आम्हाला आमची बाजारपेठ वाढवता येईल आणि विद्यमान ग्राहकांकडून अतिरिक्त व्यवसाय मिळवता येईल. तसेच, ‘मूव्हमेंट’ आणि ‘स्व-अभिव्यक्ती’ या कॅम्पसच्या मूलभूत ब्रँड तत्त्वज्ञानाशी आम्ही जोडलेले राहणार आहोत. या नवीन उत्पादनामुळे फक्त ब्रँडचा पोर्टफोलिओ वाढणार नाही, तर आधुनिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी उत्कृष्ट उत्पादने देण्याच्या आमच्या वचनबद्धतेवरही अधोरेखित होते. ही ऍथलेझर कपड्यांची श्रेणी सध्या कॅम्पसच्या अधिकृत स्टोअर्समध्ये, कंपनीच्या वेबसाईटवर तसेच ऍमेझॉन आणि मिंत्रासारख्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande