सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत 'भाजपा' ठरला किंग
सोलापूर, 16 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला. भाजपाने ६३ जागांवर विजय मिळवत बहुत मिळवले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक जागा मिळाली. महानगरपालिके
सोलापूर मनपा


सोलापूर, 16 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला. भाजपाने ६३ जागांवर विजय मिळवत बहुत मिळवले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक जागा मिळाली. महानगरपालिकेवर भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. सोलापूर महानगरपालिकेत १०२ जागांसाठी निवडणूक झाली. महापालिकेत बहुमतांसाठी ५२ जागांची आवश्यक्ता आहे. भाजपाने ६३ जागांवर विजय मिळवला. सोलापुरात भाजपाला रोखण्यासाठी भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, मनसे आणि माकप यांनी एकत्रित निवडणूक लढवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande