जनतेच्या अपेक्षा, आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी - भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील जनतेने महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीवर दाखवलेल्या अपार विश्वासाबद्दल आणि निर्विवादपणे एकहाती सत्ता भाजपच्या हाती सोपविल्याबद्दल आम्ही हृदयापासून कृतज्ञता व्यक्त करतो. अ
The mandate given to the BJP is a firm expression of faith in the ideals of development, good governance, transparent administration, and capable leadership.


छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर शहरातील जनतेने महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीवर दाखवलेल्या अपार विश्वासाबद्दल आणि निर्विवादपणे एकहाती सत्ता भाजपच्या हाती सोपविल्याबद्दल आम्ही हृदयापासून कृतज्ञता व्यक्त करतो. अशा शब्दांत भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.

खासदार कराड म्हणाले,

हा कौल म्हणजे विकास, सुशासन, पारदर्शक प्रशासन आणि सक्षम नेतृत्वाच्या विचारांवर दिलेला ठाम विश्वास आहे. जनतेच्या अपेक्षा, आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी या विश्वासातून आमच्यावर आली असून, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने केला आहे.

या ऐतिहासिक विजयाच्या आनंदानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोष साजरा करण्यात आला. पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख आणि नागरिकांनी एकत्र येत ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत आणि आनंद व्यक्त करत हा क्षण साजरा केला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande