रत्नागिरी : जि. परिषद शाळांमधील ५० मुले जाणार नासा, इस्रोला
रत्नागिरी, 16 जानेवारी, (हिं. स.) :रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५० विद्यार्थ्यांची निवड अमेरिकेतील ''नासा'' (NASA) आणि भारतातील ''इस्रो'' (ISRO) या जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांच्या भेटीसाठी करण्यात आली आहे. मिशन गगनभरारी या महत्त्वाकांक्षी
रत्नागिरी : जि. परिषद शाळांमधील ५० मुले जाणार नासा, इस्रोला


रत्नागिरी, 16 जानेवारी, (हिं. स.) :रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५० विद्यार्थ्यांची निवड अमेरिकेतील 'नासा' (NASA) आणि भारतातील 'इस्रो' (ISRO) या जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांच्या भेटीसाठी करण्यात आली आहे.

मिशन गगनभरारी या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांचा अंतराळ सफरीचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. यासाठी २० हजार विद्यार्थ्यांनी चाचणी परीक्षा दिली होती.

विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी हा नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेण्यात आली. त्यात १०० गुणांची विज्ञान विषयावर आधारित परीक्षा घेण्यात आली. ही चाचणी परीक्षा केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावर घेण्यात आली. नऊ तालुक्यांतून प्रत्येकी १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातील ५० विद्यार्थ्यांची इस्रो आणि नासासाठी निवड केली गेली. यातील २० विद्यार्थी नासाला जातील. सोबत ६ शिक्षकांनाही संधी दिली जाणार आहे. या निवड चाचणी परीक्षेसाठी जिल्ह्यातील २० हजार विद्यार्थी बसले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande