बीड - घरफोडीतल्या आरोपीकडून कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न
बीड, 16 जानेवारी, (हिं.स.)। घरफोडीच्या गुन्ह्यात परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने पोलिस कोठडीत पन्याने स्वतःच्या हातावर वार करुन घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात परळी शहर पोलिस ठ
बीड - घरफोडीतल्या आरोपीकडून कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न


बीड, 16 जानेवारी, (हिं.स.)। घरफोडीच्या गुन्ह्यात परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने पोलिस कोठडीत पन्याने स्वतःच्या हातावर वार करुन घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

विरसिंग शेरसिंग गोके (२४, रा. अंबाजोगाई) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव आहे. परळी शहरातील संभाजीनगर पोलिसांनी विरसिंग याला १३ जानेवारी रोजी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केले होते. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. १४ जानेवारी रोजी तो पोलिस ठाण्याच्या कोठडीत बंद असताना वीज गेल्याने अंधार झाला होता. याचा फायदा घेत व घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासापासून पोलिसांना परावृत्त करण्याच्या इराद्याने विरसिंग याने बाथरुमच्या पत्र्याचा तुकडा काढून त्याने हातावर कार करुन घेत स्वतः ला जखमी करून घेतले व आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने विरसिंग याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande